उत्पन्न दाखला काढण्यासाठी संपूर्ण प्रोसेस व लागणारी कागदपत्र | Complete process and required documents for obtaining income certificate

उत्पन्न दाखला: हा एक अधिकृत दस्तऐवज आहे जो एखाद्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची प्रमाणित नोंद पुरवतो. हा दाखला संबंधित तहसील कार्यालय, महसूल विभाग किंवा स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांकडून दिला जातो.

आपले सरकार

उत्पन्न दाखला [ Income Certificate]

WWW.SUYOMS.COM 

JOIN WHATSAPP

Age Calculator

उत्पन्न दाखल्याचा उपयोग:

शैक्षणिक सवलतीसाठी: शिष्यवृत्ती, शुल्क सवलत इत्यादीसाठी.

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी: विविध अनुदान व सवलतींसाठी.

आरक्षणासाठी : आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र काढताना.

बँक आणि कर्ज प्रक्रियेसाठी: शैक्षणिक कर्ज, कृषी कर्ज व इतर योजनांसाठी.

कोठे अर्ज करावा?

ऑनलाईन: महाराष्ट्रात उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी महाऑनलाइन पोर्टल वर अर्ज करता येतो.

ऑफलाईन: जवळच्या तहसील कार्यालयात अर्ज करून मिळवता येतो.

उत्पन्न दाखल्याचे किती प्रकार असतात ?

⎆ सामान्य उत्पन्न दाखला (General Income Certificate)

 हा सर्वसाधारण उत्पन्न दाखला असून, शैक्षणिक सवलती, कर्जप्रक्रिया, इतर शासकीय योजनांसाठी लागतो. 

 हा तहसीलदार किंवा महसूल विभागाद्वारे दिला जातो. 

⎆ आर्थिक दुर्बल घटक (EWS) उत्पन्न दाखला

 हा दाखला सामान्य प्रवर्गातील (General Category) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असतो. 

 अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी असावे. 

 केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी लागतो. 

⎆ कुटुंबाचे उत्पन्न दाखला (Family Income Certificate)

 संपूर्ण कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती देणारा दाखला. 

 सरकारी अनुदान, शिष्यवृत्ती, तसेच काही विशिष्ट योजनांसाठी लागतो. 

 अर्जात कुटुंबातील कमावत्या सदस्यांची माहिती द्यावी लागते.. 

⎆ इतर विशेष प्रकार: काही राज्यांमध्ये उत्पन्न दाखल्याचे विशेष प्रकार उपलब्ध असतात, जसे की

 शेती उत्पन्न दाखला (कृषी उत्पन्नाच्या आधारे काढला जातो) 

 व्यावसायिक उत्पन्न दाखला (व्यवसायिकांकडून काढला जातो) 

आपले सरकार पोर्टलवरून उत्पन्न दाखला कसा काढायचा?

१) जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करणार असाल, तर प्रथम आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.

⎆ आपले सरकार पोर्टल उघडा

⎆ नवीन अर्जदार असल्यास "New User? Register Here" वर क्लिक करा. 

⎆ दोन पर्याय मिळतील:

१. OTP आधारित नोंदणी (मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक आवश्यक)

२. UID आधारित नोंदणी (Aadhaar E-KYC द्वारे)

⎆ तुमचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका आणि OTP व्हेरिफाय करा.

⎆ नाव, पत्ता, जिल्हा, तालुका, आधार क्रमांक भरून खाते तयार करा.

⎆ एकदा खाते तयार झाल्यानंतर लॉगिन करा.

२) उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज करा (Apply for Income Certificate):

⎆ लॉगिन केल्यानंतर "Revenue Department" (महसूल विभाग) निवडा.

⎆ त्याखाली "Income Certificate" (उत्पन्न दाखला) सेवा निवडा.

⎆ अर्जदाराचा अर्ज उघडेल त्या मध्ये आवश्यक माहिती भरा.

⎆ अर्जदाराचा संपूर्ण नाव, पत्ता, जन्म दिनांक.

⎆ आधार क्रमांक.

⎆ कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न.

⎆ कुटुंबातील कमावत्या सदस्यांची माहिती

⎆ उत्पन्नाचा स्रोत (नोकरी, शेती, व्यवसाय इ.)

३) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:

ओळखपत्रासाठी- आधार कार्ड

⎆ रहिवासी पुरावा- रेशन कार्ड, वीज बिल, पाणी बिल इ.

⎆ उत्पन्नाचा पुरावा- मागील वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र/तलाठी उत्पन्न अहवाल/नोकरीचे वेतन प्रमाणपत्र / शेतीचा सातबारा

⎆ अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो

अर्जदाराचे स्वघोषणापत्र

४) अर्ज सादर करा आणि शुल्क भरा.

⎆ सर्व माहिती भरल्यानंतर व कागदपत्रे अपलोड केल्या नंतर Submit या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा.

⎆ उत्पन्न दाखल्यासाठी ऑनलाईन शुल्क भरा.

⎆ उत्पन्न दाखल्यासाठी अंदाजे ५० ते १०० रुपये शुल्क लागू शकतो तो तुम्ही ऑनलाईन नेट बँकिंग/डेबिट कार्ड/UPI द्वारे पेमेंट करू शकता.

⎆ अर्ज यशस्वीपणे सादर झाल्यावर एक Application ID / Reference Number मिळेल. ती Acknowledgement Receipt डाउनलोड करा.

५) अर्जाची सध्याची स्थिती कशी तपासायची ?

 अर्ज सबमिट केल्यानंतर तहसीलदार ऑफिसकडून पडताळणी केली जाते.

 त्या नंतर Application Status पर्यायावर क्लिक करून अर्जाची स्थिती तपासा.

 अर्ज मंजूर झाल्या नंतर आपण उत्पन्न दाखला PDF स्वरूपात डाउनलोड करून प्रिंट काढू शकता.

उत्पन्न दाखला मिळण्यासाठी किती वेळ लागतो:

⎆ उत्पन्न दाखला मिळण्यासाठी 7 ते 15 कार्यदिवसांमध्ये दाखला मिळतो.

⎆ अर्जात काही त्रुटी असल्यास तहसीलदार कार्यालयाकडून त्या विषयी सूचना दिली जाईल.

त्वरित उत्पन्न दाखला हवे असल्यास ?

⎆ त्वरित उत्पन्न दाखला हवा असल्यास जवळील CSC सेंटर (Common Service Center) किंवा सेतू सुविधा केंद्राला भेट द्या.

⎆ अधिकृत ऑपरेटर तुमच्या वतीने अर्ज सबमिट करून लवकर उत्पन्न दाखला मिळवण्यास मदत करू शकतो.

महत्वाचे मुद्दे

⎆ अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा.

⎆ कागदपत्रे स्पष्ट आणि योग्य स्वरूपात अपलोड करा.

⎆ अर्ज मंजूर झाल्यावर उत्पन्न दाखला हा ३१ मार्च पर्यंत वैद्य राहतो त्या नंतर पुन्हा नविन अर्ज सादर करावा लागतो.

इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचू शकतात.
👇 महत्त्वाच्या लिंक 👇


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area